आदरणीय मान्यवर

पंचायत समिती जत कार्यालयामध्ये आपले स्वागत आहे.

पंचायत समिती जत ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. डिजिटल इंडियाच्या उद्दिष्टांनुसार, समितीने आपले संकेतस्थळ प्रभावीपणे विकसित केले असून, त्याद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘डिजिटल पंचायत’ ही संकल्पना राबवली जात आहे. या संकेतस्थळावर पंचायत समितीच्या विविध योजना, त्यांची सविस्तर माहिती तसेच विभागनिहाय माहिती सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे योजनांची माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत – अगदी शेवटच्या आणि दुर्बल घटकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञानविषयक धोरणांचे पालन करत, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींची माहिती, योजनांची अंमलबजावणी व प्रगती या संकेतस्थळावरून सहज मिळवता येईल. योजना राबवताना आणि त्याची आखणी करताना नागरिकांच्या सूचना व अभिप्रायांचा विचार केला जाईल. त्यामुळे ही विकासप्रक्रिया अधिक प्रभावी, पारदर्शक आणि जनसहभागातून समृद्ध होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.

Read More